Wednesday, November 21, 2012

Me



तुझ्या  पाठोपाठ  तुझ्या  जगात आले 
तुझ्या  विश्वातच  माझे  मन रमले 
तुझ्या  स्वप्नात स्वप्न रंगवू लागले 
ते खरे झाले तर , तुझ्या आनंदातच आनंद मानू लागले 


स्त्री म्हणून माझं हेच जीवन , असे  मी मानत नाही
पण ह्यात ही एक वेगळंच सुख आहे , हे  काय  मी जाणत  नाही ?

केली नोकरी , पैसे  कमावले 
काय होते ते  करियर बनवले ,
हे नेहमीच  असे  राहील 
असे मात्र  मनी नाही धरले 

नवीन देशात , नवीन राज्यात 
मी आले माझ्या घरात 
ते सजवताना , त्यात राहताना 
आठवते कधीतरी मात्र  मला , मीच , नोकरी करताना 

आयुष्यात सगळेच मिळत नाही ,
जे आहे ते ही काही वाईट नाही 
जेवढे आहे त्यातच सुख बघायचे 
देवाने आपल्यासाठी हेच आखले  असे  मानायचे 

खरे  जाणले तर , आपल्याकडे सगळेच आहे 
बस , 'काही अजून ' मिळाले तर जग  सुंदर  आहे 

भविष्याकडे वळताना , हे  'काही अजून ' मिळवताना 
आपण आपले आज गमावतो 
आताचा क्षण आताच जगायचा 
हे मात्र उशीरा समजतो.