तुझ्या विश्वातच माझे मन रमले
तुझ्या स्वप्नात स्वप्न रंगवू लागले
ते खरे झाले तर , तुझ्या आनंदातच आनंद मानू लागले
स्त्री म्हणून माझं हेच जीवन , असे मी मानत नाही
पण ह्यात ही एक वेगळंच सुख आहे , हे काय मी जाणत नाही ?
केली नोकरी , पैसे कमावले
काय होते ते करियर बनवले ,
हे नेहमीच असे राहील
असे मात्र मनी नाही धरले
नवीन देशात , नवीन राज्यात
मी आले माझ्या घरात
ते सजवताना , त्यात राहताना
आठवते कधीतरी मात्र मला , मीच , नोकरी करताना
आयुष्यात सगळेच मिळत नाही ,
जे आहे ते ही काही वाईट नाही
जेवढे आहे त्यातच सुख बघायचे
देवाने आपल्यासाठी हेच आखले असे मानायचे
खरे जाणले तर , आपल्याकडे सगळेच आहे
बस , 'काही अजून ' मिळाले तर जग सुंदर आहे
भविष्याकडे वळताना , हे 'काही अजून ' मिळवताना
आपण आपले आज गमावतो
आताचा क्षण आताच जगायचा
हे मात्र उशीरा समजतो.
No comments:
Post a Comment